वारणानगर / प्रतिनिधी
आरळे ता. पन्हाळा येथील मामाच्या गावी आलेल्या अल्पवयीन मुलीस फुसलावून पळवून नेल्याप्रकरणी तिघांवर कोडोली पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत अल्पवयीन मुलीचे मामा सागर बुधाजी महापूरे वय ३२, रा. आरळे ता .पन्हाळा यानी फिर्याद नोंदवली आहे.
अक्षय चंद्रकांत नांगरे, साहिल चंद्रकांत नांगरे, अमर साळवी सर्व रा. कोडोली ता.पन्हाळा याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी दि. २९ रोजी सकाळी ६.३० वा.सुमारास अल्पवयीन मुलीस आरळे येथून पळवून नेले आहे. सदर मुलगी १७ वर्ष १० महिने वयाची असून ती हातकंणगले तालुक्यातील आहे.पो.ना.सुतार पो.हे.कॉ. चिले तपास करीत आहेत.
Previous Article“कुंभी कासारी” कोविड सेंटरचे उद्घाटन
Next Article अंधारी गावाने दिली सामाजिक बहिष्काराला मूठमाती









