सांगली / प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी तीन वर्षे सक्त मजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुनील उर्फ आप्पू महादेव कुंभार (वय २३ रा.अचकनहळ्ळी, ता. जत) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. २० डिसेंबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. सरकारी पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.








