बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी विधान सौधच्या २ किलोमीटरच्या परिसरात ४ ते ३१ मार्च दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.
दोन्ही सभागृहांच्या सत्रासाठी सुरक्षा कवच उपलब्ध करुन देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेत अडथळा न आणण्यासाठी निदर्शक आणि मोर्चाच्या बंदीविषयक हा आदेश लावण्यात आला आहे.
कर्नाटक राज्य विधानसभेचे महिनाभराचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ४ मार्चपासून सुरू होईल. दरम्यान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा ८ मार्च रोजी विधानसभेत आपला ८ वा अर्थसंकल्प मांडतील.