नवी दिल्ली
वित्त मंत्रालयाने 2021-22 च्या अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेच्या कामाचा प्रारंभ येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. गुरुवारी या संदर्भात अधिसूचना सादर केली आहे. दुसऱया टप्प्यातील मोदी सरकारच्या काळातील वित्त मंत्री निर्मला सीतारामन या तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सध्या कोविडच्या संकटामुळे आर्थिक वृद्धीमध्ये मोठी घसरण आली आहे. तसेच महसूल संकलनातही मोठी घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे यासह अन्य आर्थिक समस्यांवर यातून मार्ग काढण्याचे आव्हान केंद्रापुढे राहणार असल्याचे संकेत आहेत.









