ऑनलाईन टीम / मुंबई :
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अलिबाग कारागृह अधीक्षक ए. टी. पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.
नाईक आत्महत्या प्रकरणातील या तिन्ही आरोपींना अलिबागमधील एका शाळेत उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. ही जागा सुरक्षित नसल्याने आरोपींनी तळोजा कार्यालयात हलवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती.
त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृह महानिरीक्षकांची परवानगी घेऊन अर्णब यांच्यासह तिन्ही आरोपींना आज सकाळी तळोजा कारागृहात हलविण्यात आले.









