वृत्तसंस्था/ पुणे
अर्जुन चौधरी व ऋत्विक चौधरी यांनी इटलीतील ओल्बिया येथे झालेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी सर्बियाच्या इव्हान साबानोव्ह व मेट साबानोव्ह यांच्यावर 6-1, 6-3 असा विजय मिळविला.
अर्जुन-ऋत्विक यांच्या उपांत्य फेरीत कडवी झुंज देत विजय मिळवावा लागला होता. तीन मॅचपॉईंट्स वाचवत त्यांनी झेकच्या रोमन जेबाव्ही व झेनेक कोलार यांच्यावर 2-6, 7-6 (11-9), 10-7 अशी मात केली. या दोघांचे हे पहिलेच जेतेपद आहे. गेल्या जूनपासून ते एकत्र खेळत आहेत. कढेसाठी मात्र हे पाचवे चॅलेंजर ट्रॉफी जेतेपद असून ऋत्विकचे हे चॅलेंजर सर्किटवरील पहिलेच जेतेपद आहे. मात्र त्याने 8 आयटीएफ अजिंक्यपदे मिळविली आहेत. निक्की कालियांदा पोनाचासमवेत खेळताना त्याने हे यश मिळविले आहे.









