इटानगर / वृत्तसंस्था
अरुणाचल प्रदेशमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजून 11 मिनिटांनी राज्यातील बहुतांश भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणत्याही ठिकाणी जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. मागील रविवारीही अरुणाचलच्या सीमावर्ती भागात भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यापूर्वी गेल्या शनिवारी जम्मू काश्मीरच्या विविध भागात आणि गुजरातच्या कच्छ भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.









