वृत्तसंस्था/ लखनौ
अयोध्येतून विजयी झालेले समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. सपा स्टुडंट असेंब्लीचे राष्ट्रीय सरचिटणीस मनोज पासवान यांनी अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांना पत्र लिहून नवनिर्वाचित खासदाराच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शनिवारी लखनौ येथील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे सर्व खासदार आणि उमेदवार उपस्थित होते. याचदरम्यान कार्यालयाबाहेर अखिलेश यादव यांचा फोटो असलेले पोस्टर्स आणि ‘सबका अखिलेश, अयोध्या के अवधेश’ असे मोठे बॅनर लावण्यात आले होते.









