कर्जात बुडत चालली आहे महासत्ता
कोरोनामुळे जगातील मोठय़ातील मोठी अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे. पण कोरोनाचा आर्थिक प्रहार अमेरिकेत अधिकच तीव्रतेने झाला आहे. अमेरिकेवरील जागतिक कर्जात वेगाने भर पडली आहे. जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेवरील कर्ज वाढून 29 लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.
अमेरिकेवरील सद्यकाळातील कर्जाचा भार हा भारताच्या जीडीपीच्या सुमारे 10 पट अधिक आहे. पण अमेरिकेवर भारताचेही कर्ज आहे. मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेवरील भारताचे कर्ज वेगाने वाढले आहे. सध्या अमेरिकेवर भारताचे कर्ज 21,600 डॉलर्स म्हणजेच सुमारे 16 लाख कोटी रुपयांचे आहे.
अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत सुमारे 7 पटीने मोठी असून तिचा आकार 21 ट्रिलियन डॉलर्सचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या 3 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे.
अमेरिकेवरील सर्वाधिक कर्ज चीन आणि जपानचे आहे. 2020 मध्ये अमेरिकेचा एकूण राष्ट्रीय कर्ज भार 23,400 डॉलर्स इतका होता. कर्जाचे दरडोई सरासरी काढल्यास अमेरिकेच्या प्रत्येक नागरिकावर सुमारे 72,309 डॉलर्सचे कर्ज आहे. चीन आणि जपानकडूक अमेरिकेने प्रत्येकी 1000 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे.









