चीन अन् जपानच्या लोकांना टाकले मागे
अमेरिकेत राहणारे भारतीय स्वतःच्या कौशल्यामुळे सातत्याने प्रगती करत असून समृद्धीचे नवे उच्चांक गाठत आहेत. महाविद्यालयीन शिक्षण आणि मालमत्तेप्रकरणी भारतीयांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत अत्यंत उत्तम कामगिरी केल्याचे तेथे अलिकडेच पार पडलेल्या जनगणनेतून समोर आले आहे.
अमेरिकेतील भारतीयांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 1,23,700 डॉलर्स झाले आहे. तर अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येचे सरासरी उत्पन्न 63,222 डॉलर्स आहे. अमेरिकेत राहणाऱया भारतीयांपैकी 79 टक्के जणांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहेत. तर अमेरिकेतील राष्ट्रीय सरासरी 34 टक्के आहे.
अन्य आशियाई रहिवासी पिछाडीवर

भारतीयांच्या या दमदार कामगिरीमुळे अन्य आशियाई रहिवासी मागे पडले आहेत. अमेरिकेत राहणाऱया तैवानी लोकांचे सरासरी उत्पन्न 97 हजार डॉलर्स आहे. तर फिलिपाईन्सच्या लोकांचे 95 हजार डॉलर्स आहे. चिनी लोकांचे सरासरी उत्पन्न 85,229 डॉलर्स तर जपानी लोकांचे 84,068 डॉलर्स राहिले आहे.
गरीबीचे प्रमाण घटले
अमेरिकेत राहणाऱया भारतीयांमधील गरीबीच्या आकडेवारीत लक्षणीत घट झाली आहे. अमेरिकेत राहणाऱया भारतीयांपैकी केवळ 14 टक्के जणांचे उत्पन्न 40 हजार डॉलर्सपेक्षा कमी आहे. अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांपैकी 25 टक्के जणांनी आपले उत्पन्न 2 लाख डॉलर्सहून अधिक असल्याचे नमूद केले आहे. तर अमेरिकेत अशा लोकांची एकूण संख्या केवळ 8 टक्के आहे.









