ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका महिला संशोधकाची हत्या करण्यात आली आहे. लुटीच्या आरोपाखाली ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
शर्मिष्ठा सेन (वय 43) असे या संशोधक महिलेचे नाव आहे. ती टेक्सासमधील प्लानो शहरात राहत होती. एक ऑगस्ट रोजी चिशोम ट्रेल पार्कजवळ जॉगिंग करताना त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. एका प्रवाशाला हेरिटेज ड्राइव्ह आणि मार्चमनजवळील खाडी परिसरात त्यांचा मृतदेह दिसला.
शर्मिष्ठा सेन या कॅन्सर रुग्णांसाठी काम करत होत्या. त्यांना दोन मुले आहेत. त्या रोज सकाळी चिशोम ट्रेल पार्कजवळ जॉगिंग करण्यासाठी येत होत्या.









