ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाविरुद्ध लढा अधिक तीव्र करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्रीय रणनीती आखली आहे. अमेरिकेत परदेशी प्रवाशांना कोरोना चाचणी आणि विलगीकरण बंधनकारक करण्यात आली आहे. बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केली.
बायडेन म्हणाले, परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने विमानात बसण्यापूर्वी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. तसेच अमेरिकेत आल्यानंतर त्यांना विलगीकरणात रहावे लागणार आहे.
दरम्यान, अमेरिकेत कोरोनाबधितांची संख्या 2.5 कोटींवर पोहचली असून, 4.24 लाख रुग्णांचा बळी गेला आहे.









