ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 58 हजार 586 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 42 हजार 230 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शुक्रवारी 1 लाख 32 हजार 540 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 1248 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 कोटी 58 हजार कोरोना रूग्णांपैकी 63 लाख 91 लाख 208 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 34 लाख 25 हजार 148 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 18 हजार 303 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 15 कोटी 51 लाख 48 हजार 732 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 10 लाख 07 हजार 155 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 19 हजार 154 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 9 लाख 65 हजार 523 जणांना बाधा झाली असून, 17 हजार 939 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 58 हजार 950 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 786 जणांचा मृत्यू झाला आहे.









