मालवण /प्रतिनिधी-
मालवण मधील एकता मित्र मंडळ आणि ग्लोबल रक्तदाते या सामाजिक संस्थेचे खंदे कार्यकर्ते तसेच मालवणचे युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय आनंद देसाईं यांच्या कोरोना महामारीमधील विविध कार्याची व उपक्रमांची दखल घेत रोटरी क्लब, मालवण आणि जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र या दोन संस्थांकडून कोविडयोद्धा म्हणून गौरव करण्यात आला.
रोटरी क्लब मालवण तर्फे अमेय देसाई यांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. त्यावेळी रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर, सचिव रतन पांगे, रोटरीयन सुहास ओरस्कर , अभय कदम, महेश काळसेकर, अमरजित वनकुद्रे, आनंद देसाई व सौ.आशा देसाई ,अपूर्वा देसाई ,उत्तम पेडणेकर, केदार देसाई ,मनोज गिरकर, तुषार मेस्त्री आदी उपस्थित उपस्थित होते. तर जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र या संस्थेतर्फेही अमेय देसाई यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी अमेय देसाई यांना सन्मानपत्र प्रदान केले आहे.









