नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन
अमिताभ बच्चन यांचा स्पोर्ट्स-ड्रामा चित्रपट ‘झुंड’च्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली आहे. यासंबंधीची माहिती अमिताभ यांनीच सोशल मीडियावर चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करत चाहत्यांना दिली आहे. ‘या टोळीचा मुकाबला करण्यासाठी व्हा तयार. आमची टीम येतेय’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

झुंड हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे स्लम सॉकरचे संस्थापक विजय बरसे यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. झोपडपट्टींमधील मुलांना एक फुटबॉल टीम तयार करण्यासाठी प्रेरित करणाऱया आणि त्यांना जीवनाचा उद्देश मिळवून देणाऱया प्राध्यापकाची भूमिका ते साकारत आहेत.
झुंड या चित्रपटाचे प्रदर्शन कोरोना संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडले होते. परंतु अखेरीस हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन याला लाभल्याने तो उत्तम असेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.









