नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील आघाडीवरची बँक ऍक्सिस बँकेने अमिताभ चौधरी यांची येणाऱया 3 वर्षासाठी व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाने अमिताभ चौधरी यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांची नियुक्ती जानेवारी 2022 पासून प्रत्यक्षात होणार आहे. याआधी चौधरी यांनी एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीचे एमडी आणि सीईओ पद सांभाळले हेते. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत अमिताभ चौधरी आपले पद सांभाळणार आहेत. रिझर्व्ह बँक आणि बँकेच्या शेअरधारकांची मंजुरी मात्र अद्याप मिळायची आहे.