ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (former cm panjab amarinder singh) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये (congress) राहणार नसल्याचं तर भाजपमध्ये (BJP) जाणार नाही असं म्हणत स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी आपण आगामी पंजाब विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हंटले होते. यासाठी ते भाजप बरोबर युती करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी युतीचा फॉर्म्युला देखील ठरवला आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं बुधवारी पत्रकार परिषद घेत सांगितलं. तसेच आपला नवा पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु ते अकाली दलासोबत युती करण्यास तयार नाहीत, असं कॅप्टन यांनी स्पष्ट केलंय. तसेच पक्षाचे नाव अद्याप ठरलेले नाही, असेही ते म्हणाले. “आम्ही चिन्ह आणि नावासाठी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यावर कळवू, त्यांना निर्णय घेऊ द्या, असेही कॅप्टन म्हणाले. तसेचे आम्ही राज्यात ११७ जागा लढवू आणि आमच्यासोबत काँग्रेसचे बरेच लोक येत आहेत,” असा दावाही सिंग यांनी केलाय.