नवी दिल्ली
ऍसिड बॅटरी उद्योगातील तिरूपतीची कंपनी अमराराजा यांनी लिथीयम बॅटरी उद्योगात आता लक्ष घालणार असल्याची घोषणा केली आहे. अमरॉन ब्रँडअंतर्गत कार्यरत असणाऱया अमराराजा आता लिथीयम आयन बॅटरीच्या उत्पादनात लक्ष घालणार आहे. या योगे आपल्या व्यवसायाचा विस्तार अधिकाधिक करता येणे शक्य होणार आहे. लिथीयम आयन आणि इतर संबंधीत उत्पादने नजिकच्या काळात कंपनीकडून निर्मिली जाणार आहेत. याअंतर्गत लिथीयम सेल, बॅटरी, इलेक्ट्रीक वाहनांचे चार्जर, ऊर्जा साठवणूक यंत्रणा, आधुनिक घरगुती ऊर्जा उत्पादने व इतर संबंधीत उत्पादने तयार केली जाणार आहेत.









