तरुण भारत ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि दुबईचे उद्योजक सूरज नाम्बियार विवाह बंधनात अडकले आहेत.त्यांचा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. या लग्नाला दोघांचे कुटुंब, मित्र आणि अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.मल्याळी रितीरिवाजानुसार मौनीचे लग्न लावण्यात आले आहे. आता मौनी आणि सूरज या नवजोडप्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी दोघे पुन्हा बंगाली रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न करणार आहेत. मौनीने लग्नात पांढरी साडी नेसली आहे. ज्याची बॉर्डर लाल आणि सोनेरी कलरची आहे. मौनीने सोन्याच्या दागिन्यांसह साउथ इंडियन वधूच्या लुकमध्ये पाहायला मिळाली. तर सूरज देखील साउथ इंडियन वराच्या रुपात पाहायला मिळाला. त्याने लुंगी आणि क्रीम रंगाचे शर्ट घातले होते. सूरज काही फोटोमध्ये मौनीला मंगलसूत्र घालताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत दोघेही एकमेकाला वरमाला घालताना दिसत आहे. लग्नात हजेरी लावणाऱ्या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी देखील बंधनकारक करण्यात आली होती.