सांगली / प्रतिनिधी
ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या बद्दल बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ख्रिश्चन एकता मंच यांच्यावतीने सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
करीना कपूर यांच्या प्रेग्नेंसी बायबल या नावाच्या पुस्तकामुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी करीना कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ख्रिश्चन एकता मंचचे राज्य कार्याध्यक्ष अँलन सॅमसंग काळे व राज्य उपाध्यक्ष अमित भोरे यांनी केली आहे.