वार्ताहर / व्हनाळी
आज अभिनेत्री कंगना राणावत यांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर मुंबईची पाकिस्तानशी तुलना करून काही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने आज बाचणी ता.कागल येथे राणावत यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र शब्दात जाहिर निषेद करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे म्हणाले, पाकिस्तानचे गोडवे गाणा-या व संपुर्ण भारतीयांच्या भावणा दुखावणारे भाष्य कणा-या अभिनेत्री राणावत यांचा आम्ही कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने जाहिर निषेध करत आहोत. तसेच यापुढे त्यांनी आशा पध्दतीचे वक्तव्य केल्यास संपुर्ण महाराष्ट्रात त्यांचे चित्रपट बंद पाडू शिवाय जशासतसे उत्तर देवू अशा तीव्र भावणा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी कागल तालुका प्रमुख अशोकराव पाटील म्हणाले, राणावत यानी भारतात राहून कांही आपशब्द वापरले आहेत हे चुकीचे असून ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही त्यांना जर पाकिस्तान विषयी आपुलकी वाटत असेल तर त्यांना भारतात राहण्याचा अधिकार काय असा सवाल यावेळी राणावत यांच्या विधानाबाबत अशोकराव पाटील यांनी केले. यावेळी राणावत चले जाव… कंगना राणा मुडदाबाद …. अशा निषेधाच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. यावेळी डॉ प्रदिप पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख संदिप पाटील शिवसैनिक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









