ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. सोनू सूदची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने सोनू सूदविरोधात जी कारवाई केली आहे, ती योग्यच आहे, असे हायकोर्टाने सांगितले आहे.
सोनू सूदने जुहू येथील एका निवासी इमारतीममध्ये व्यावसायिक वापरासाठी बदल केले होता. त्यासाठी पालिकेने याआधी दोन वेळा बांधकाम तोडल्याची कारवाई केली होती. परंतु, प्रत्येक कारवाईनंतर सोनू सूदने त्याच जागी पुन्हा नव्याने बांधकाम केल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने सोनू सूद विरोधात जुहू पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. या सर्व कारवाई विरोधात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, सोनू सूदविरोधात कारवाई करण्याचा आता मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांचाही मार्ग मोकळा झाला आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने सोनू सूद विरोधात जुहू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तसेच हायकोर्टाच्या निर्णयानंतर पालिकेने सोनू सूदला जी नोटीस पाठवली होती, त्यापुढील कारवाई करण्याचाही मार्ग आता मोकळा झाला आहे.