प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी अभिजीत खांडकेकर याने यंदा घरगुती दिवाळी फराळासाठी किसान कनेक्टच्या होमकिचनवर मनापासून विश्वास ठेवला आहे. किसानकनेक्टच्या शेतकऱयांशी वैयक्तिक गप्पा मारताना अभिजीतने सध्याची कठीण परिस्थिती आणि या परिस्थितीत ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतकऱयांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या संकटाविषयी दु:ख व्यक्त केले.
मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर इत्यादी मोठय़ा शहरांत कोव्हिड- 19 च्या महामारीने हाहा:कार माजवलेला असताना महाराष्ट्रभरातल्या शेतकऱयांना आपण मदतीचा हात द्यायलाच हवा, असे अभिजीत म्हणाला. किसानकनेक्टच्या देसी दिवाळी बास्केट या खास आकर्षक आणि पारंपरिक दिवाळी फराळामुळे चकली, शंकरपाळे, चिवडा, करंजी, बेसनाचे लाडू इत्यादी पारंपरिक पदार्थांची लज्जत चाखता येते आणि या फराळामुळे मला माझ्या लहानपणीची आठवण येते. माझी आई आणि आजी असाच सुंदर, चविष्ट फराळ घरी तयार करायच्या, अशा आठवणीही अभिजीतने सांगितल्या. किसानकनेक्टच्या होमकिचन या उपक्रमाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडणाऱया शेतकरी, ग्रामीण महिलांनी हा सगळा फराळ आपल्या हातांनी बनवला आहे. या दिवाळी फराळाला खरी पारंपरिक चव देण्यासाठी या महिला उत्तम दर्जाचे तेल आणि गायीचे शुद्ध तूप वापरतात. लॉकडाऊनच्या काळात किसानकनेक्टने ताज्या भाज्या आणि फळे पुरवल्याबद्दल अभिजीतने कृतज्ञता व्यक्त केली. किसान कनेक्ट ऍपच्या माध्यमातून ताजा शेतमाल थेट शेतातून ग्राहकांच्या दारात अगदी कॉण्टॅक्टलेस डिलीव्हरी पद्धतीने पोहोचवला जातो. अभिजीत नेहमीच या ऍपवरून फळ-भाज्यांची खरेदी करतो. एफएसएसएआयच्या इट राईट इंडिया या मोहिमेला किसान कनेक्टच्या शेतकऱयांनी पाठिंबा दिला असून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी सगळय़ांनाच ताजे, पोषक आणि स्वच्छ अन्न खाण्याचा हक्क आहे, हा या मोहिमेतून दिला जात आहे. किसान कनेक्टच्या ऍपवरून ताज्या आणि स्वच्छ भाज्या व फळे मिळत असल्यामुळे मेघना एरंडे, राजेश कुमार आणि आसिफ शेख यांसारखे अनेक टीव्ही कलाकार या सेवेचा मनसोक्त लाभ घेतात.









