सांगली/ प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली तर्फे आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मुद्द्यांबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
अभाविप सांगली तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी समस्या, 30% शैक्षणिक शुल्क माफ करावे व धुळ्यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयात विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवावा व महाराष्ट्रातील सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश फार्मा व्हिजन संयोजक प्रवीण जाधव, महानगर मंत्री विशाल जोशी, जिल्हा संयोजक जयदीप पाटील, सह संयोजक बाहुबली छत्रे उपस्थित होते