प्रतिनिधी / अब्दूलाट
अब्दूलाटमध्ये जुलै 2019 च्या महापुरात झालेल्या अनुदान वाटपात घोटाळ्याची चौकशी करावी अन्यथा 29 जून रोजी शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आज एका निवेदनाद्वारे शिरोळ चे नायब तहसीलदार संजय काटकर यांना सामाजिक कार्यकर्ते प्रा,संजय परीट आणि शेतकरी विकास समितीचे अध्यक्ष शेतकरी नेते विद्याधर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.
येथे जुलै 2019 मध्ये आलेल्या महापुरात शासनाने दिलेल्या अनुदान वाटपात प्रचंड घोटाळा झाला असून या प्रकरणात फेरसर्व्हे करावा, चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचारी आणि बोगस पंचनामे करून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर फैाजदारी दाखल करून शासनाचे पैसे वसूल करावेत आणि वंचित लाभार्थ्यांना लाभ घ्यावा या मागणीसाठी 8 जून पासून अ,लाट मधील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना यांनी आंदोलन छेडले आहे.
शासनस्तरावर अनेकदा अर्ज निवेदने देऊनही ढिम्म प्रशासन याची दखल घेत नाही याबाबत निषेध व्यक्त करत 28 जून पर्यंत चौकशी लागली नाही तर दि 29 जून रोजी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन आज देण्यात आले. पावसाळा सुरू होऊन पुन्हा महापूर येण्याची शक्यता असून वस्तुनिष्ठ चौकशी होण्यासाठी आणि गावात आंदोलकांना धमक्या देऊन दबाव आणला जात आहे त्यामुळे कायदा सुव्य वस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तासाठी तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर डॉ. दशरथ काळे,माजी सरपंच श्रीकांत मधाळे,शिवसेना विभागप्रमुख महावीर गाडवे, मा. ग्रा .सदस्य संजय कोळी ,आणू नायकुडे ,सदाशिव कुलकर्णी यांचेसह नागरिकांच्या सह्या आहेत.









