प्रतिनिधी / कुरुंदवाड
अब्दुललाट (ता.शिरोळ) येथील नोव्हेंबर2019 मध्ये झालेल्या चोरी प्रकरण गुन्ह्यातील तिसरा फरारी आरोपी परशुराम अशोक कमटेकर (वय 22 रा.कोंनूर ता.गोकाक जि. बेळगाव) यास गोकाक सबजेल मधून कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचेकडून 1 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यास कुरुंदवाड येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी त्याला 2 दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की अटक आरोपी परशुराम कमटेकर याच्याकडून कुरुंदवाड पोलिसांनी 6 मोटारसायकली, 1 संगणक संच, 1 ब्लुटूत घड्याळ, 1 मॉनिटर, व 10 मोबाईल असा एकूण 1 लाख 57 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगलमोगले करीत आहेत.









