ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये रविवारी सुप्रीम कोर्टाच्या दोन महिला न्यायाधीशांची अज्ञाताने गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात 3 महिलाही जखमी झाल्या आहेत. काबुल पोलिसांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे.
गेल्या काही महिन्यांत तालिबान आणि अफगान सरकारमध्ये शांतता करार चालू आहे. तरी देखील देशातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. काबूलमध्ये विशेषतः हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. देशात दहशत निर्माण करण्यासाठी महत्त्वाच्या पदांवरलोकांना ठार मारणे हे या हल्लेखोरांचे मुख्य ध्येय आहे.
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तालिबानचे प्रवक्ते जहिहुल्ला मुजाहिद यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यामागे तालिबानचा हात नाही. देशातील शांतता बिघडवण्यासाठी अफगान सरकार अशा घटना घडवत आहे.