भारतीय मालिकांचे तिघी करायच्या डबिंग
काबूल : अफगाणिस्तानात तीन महिला पत्रकारांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. तिघींचीही हत्या दोन विविध हल्ल्यांद्वारे करण्यात आली आहे. या महिला एनिकास टीव्ही वाहिनीसाठी काम करत होत्या. तिघीही प्रसिद्ध भारतीय नाटके आणि मालिकांचे अफगाणिस्तानातील स्थानिक भाषांमध्ये अनुवाद आणि डब करत होत्या, अशी माहिती वाहिनीचे संचालक जलमई लतिफी यांनी दिली आहे. जलालाबाद येथे सादिया आणि शहनाज या महिला पत्रकारांवर अज्ञात हल्लेखोराने गोळय़ा झाडल्या आहेत. दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱया घटनेत मुरसल हबीबीला गोळय़ा घालण्यात आल्या आहेत. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ती मलालाई मैवाड यांची 10 डिसेंबर 2020 रोजी त्यांच्या चालकासह हत्या करण्यात आली होती.









