प्रतिनिधी/ सातारा
बुलेटवरुन प्रवास करत असताना बुलेट भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून पाठीमागे बसलेल्या एकास गंभीर जखमी त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी श्रीरंग अंतू चव्हाण (वय 65 रा. नेले, ता. सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत हवालदार इसाल मुलाणी यांनी तक्रार दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, दि. 6 डिसेंबर रोजी श्रीरंग चव्हाण हे त्यांच्या बुलेट (क्रमांक एम. एच. 11 सीएन 7333) वरुन फडतरवाडी, ता. सातारा गावाकडे निघाले होते. यावेळीच्या दुचाकीवर पाठीमागे राजेंद्र काशीनाथ कणसे (वय 50, रा. फडतरवाडी, ता. सातारा) हे बसले होते. यावेळी भरधाव वेगाने जात असताना बुलेट स्लीप होवून अपघातात झाला.
यामध्ये पाठीमागे बसलेले राजेंद्र कणसे रस्त्यावर खाली पडले व ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी श्रीरंग चव्हाण यांच्यावर वाहन निष्काळजीपणे चालवत एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने व गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव करत आहेत.








