प्रतिनिधी / शिरोळ
अपघात विमा योजनेअंतर्गत ६४ सभासदांना एक लाख रुपये प्रमाणे आज अखेर धनादेश वाटप करण्यात आला. एकूण ६४ सभासदांना ६३ लाख ५० हजार रुपयांचा विमा संरक्षण लाभ देण्यात आला असल्याची माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील दादा यांनी दिली.
येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या सभासदांच्या सुरक्षितेसाठी या विम्यामध्ये दुर्दैवाने एखाद्याच्या अपघाती मृत्यू झाला अथवा अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये व तसेच एक डोळा हात पाय निकामी झाले तर ५० हजार रुपयांची विम्याची रक्कम दिली जाते, सदर विमा पॉलिसी ही युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे उतरविण्यात आली आहे.
या अपघाती विमा योजनेचा लाभ कुबेर गिरमल अब्दुललाट, आनंदा तासगावे जांभळी, आबासो पाटील शेडशाळ यांच्या कुटुंबियांना गणपतराव पाटील यांच्या हस्ते धनादेश प्रदान कार्यक्रम त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील संचालक दग गावडे, भैय्यासाहेब पाटील, महेंद्र बागे, यांच्यासह शेअर्स विभागाचे परवेज मिस्त्री युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे करमरकर व रमाकांत सूर्यवंशी उपस्थित होते.









