डिचोली/प्रतिनिधी :
डिचोलीतील सेसा खाण कंपनीत कामाला असलेल्या कामगारांना सध्या कंपनीकडून सध्या अर्धा पगार येत असल्याने कामगारांचे जिवस असह्य बनले आहे. याविषयी या कामगारां?नी सभापती राजेश पाटणेकर व मयेचे आमदार प्रविण झांटय़? यांना भेटून सरकारने जर या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घातले नाही तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागणार, असा इशारा दिला. यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन सभापती पाटणेकर यांनी दिले.
खाणी बंद झाल्यापासून सर्व कामगार कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करीतच आहेत. तरीही कामगारांची सतावणूक कंपनीने चालू ठेवली आहे. सध्या ई. लिलावाच्या खनिजाची वाहतूक सुरू आहे. मात्र कामगारांच्या भवितव्याचे कंपनीला किहीच पडून गेलेले नसून कंपनी कामगारांवर अन्याय करीत आहे. अशी तक्रार यावेळी कामगारांनी केली. खाणी सुरू होईपर्यंत तरी सरकारने कामगारांच्या हिताचा विचार करावा अणि कामगारांना दिलासा द्यावा. अशी मागणी कामगारांनी यावेळी सभापती समोर केली.
खाणी बंद पडल्याचे कारण देत सेसा कंपनीने खर्च कपातीच्या नावावर केवळ कामगारांवरच अन्याय चालविला आहे. अर्धा पगार देताना वाहतूक आणि अन्य सुविधाही बंद केल्या आहेत. अधिकारी वर्गाला पूर्ण पगार देताना कामगारांवर मात्र उपासमारीची पाळी आणली आहे. या अन्यायपुढे आमचे जगणे कठीण झाले असून सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि आम्हालाही पूर्ण पगार द्यावा. या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कामगारांचे जगणे मुश्कलीचे बनले आहे. मोठी आर्थिक समस्या उदभवली असताना कंपनीकडून आम्हाला येणे असलेली थकबाकीही कंपनीने दिलेली नाही. खाणींचे भवितव्य अधांतरी असले तरी खाणी सुरू करण्यासाठी सरकारचे सकारात्मक प्रयत्न सुरूच आहेत. हि एक समाधानाची बाब असून एकदा कधी खाणी सुरू होतात आणि आमची समस्या कायमची मिटते, याची प्रतिक्षा आम्हला लागून राहिली आहे. असे कामगारां?नी सभापतींसमोर बोलताना सांगितले.
याविषयी सरकारने गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा सरकार विरोधात कामगारांना पुन्हा आंदोलन सुरू करावे लागणार. असा इशारा कामगारांनी सभापती पाटणेकर व आमदर झांटय़? यांना दिला.
याविषयी आम्ही दोघेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून सेसा कामगारांचा विषय सोडविण्याची मागणी करणार. असे आश्वासन सभापती राजेश पाटणेकर यां?नी दिले. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांच्यासह इतर कामगारांची उपस्थिती होती.









