प्रतिनिधी / इस्लामपूर
राज्यातील जनतेला वेगवेगळया नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. यावर्षी आलेल्या महापुराने प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा विदर्भात अति पाऊस पडला. त्यामुळे ३८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान तर १८ लाख हेक्टर जमिनी वाहून गेल्या आहेत. अद्याप कसलीही नुकसान भरपाई दिलेली नाही. हे सरकार पंचनामा करीत बसले आहे. आम्ही पंचनाम्याशिवाय पुरग्रस्तांना पैसे दिले. राज्यसरकारने भरीव पॅकेज दिले नाही, तर दि.१ नोव्हेंबर रोजी भाजपा कार्यकर्ते हाताला काळया फिती लावतील, तर शेतकऱ्यांना यावर्षीची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी करावी लागेल, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.
पाटील पुढे म्हणाले, दिवाळी तोंडावर आली आहे. हे सरकार पंचनामे करीत बसले आहे. अजूनही पैसे मिळण्याची चिन्हे नाहीत. लवकरात लवकर भरीव पॅकेज यावे, अशी मागणी केली. राज्य सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे. सचिन वाझेंच्या मुळे ९ वेळा सभा स्थगित झाली. गुन्हेगारांच समर्थन करण्यासाठी सुप्रिम कोर्टात महाविकास आघाडीचे नेते गेले आहेत. हे सर्वसामान्य जनतेला न पटणारे आहे.
पाटील पुढे म्हणाले, हर्षवर्धन पाटील जे बोलले त्याचा विपर्यास करण्यात आला आहे. ते असे बोलले, काँग्रेसमध्ये असताना खूप अडचणी व कटकटी असायच्या मात्र भाजप मध्ये आल्यानंतर निवांत आहे. खा.संजय पाटील ही अशाच पध्दतीने बोलले आहेत. भाजप मध्ये असल्याने ईडी मागे लागत नाही, कारण आमच्यावर कर्ज आहे. या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पक्षप्रतोद विक्रम पाटील, सुशांत पाटील, समिर मुल्ला, रफिक तांबोळी, मुबारक मुलाणी, अशोक पाटील, भुषण पवार, बबन कदम, सनी खराडे, समिर आगा, सिकंदर पटेल, संदीपराज पवार, अल्ताफ तहसीलदार, गौरव खेतमर, सुहेल गोलंदाज, असिफ अत्तार, स्वप्निल कांबळे, कपिल सुर्यगंध, मोहन वळसे, संतोष वळसे, निवास पाटील, जीवन बादरे यांच्यासह अन्य उपस्थित होते.