मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा जनतेला इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार राज्यातही लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे अन्यथा लॉकडाऊनची मुदत वाढण्याची शक्यता आहे, अशा इशारा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी जनतेला दिला आहे. राज्यातील जनतेने घरातच रहावे. तेव्हाच लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपेल अन्यथा त्यात वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. जनतेकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येडियुराप्पा यांना फोन करून कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर अनेकवेळा आवाहन करून देखील काहीजण अनावश्यकपणे घराबाहेर पडत असल्याने येडियुराप्पा यांनी संताप व्यक्त केला आहे.









