भिलवडी/प्रतिनिधी : (संग्रहित छायाचित्र)
भिलवडी ( ता. पलूस ) येथील ग्रामपंचायतीमध्ये पूर काळातील घर पडझडीच्या ९५ हजाराच्या आनुदानासाठी अपुऱ्या कागदपत्राची पुर्तता करून घेण्यासाठी पलूस पंचायत समितीतील अधिकारी वर्गाने कॅम्प लावला होता. या कॉम्पमध्ये कागदपत्रे जमा केलेले भूपाल मोरे यांचे व त्यांच्या भावांचे आनुदान अद्याप जमा झालेले नाही. या कारणावरुन भुपाल मोरे यांनी आक्रोश करीत आनुदान जमा न झाल्यास ग्रामपंचायती समोरच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.
२०१९ च्या ऑगस्ट महिन्याच्या महापूरातील ९५ हजाराचे आनुदान १९० लोकांचे अद्याप खात्यावर जमा झालेले नाहीत. भुपाल मोरे यांच्या संपुर्ण घराची भिंत पूरात कोसळली आहे. याची पहाणी ही जिल्हाअधिकारी अभिजीत चौधरी व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि गावच्या प्रमुख नेत्यांनी केली होती. परंतु त्यांचे आणि त्यांच्या भावांचे अनुदान अद्याप जमा झाले नाही. त्यांनी या कॉम्पमध्ये कागद पत्राची पुर्तता करीताच त्यांना प्रशासनांकडून समाधान कारक उत्तर मिळाले नाही. त्यांचे सर्व भाऊ स्वतंत्र राहतात. व घरपट्टी आणि पाणी पट्टी कर ग्रामपंचायतीस स्वतंत्र भरतात यामुळे त्यांना लाभ मिळणे आवश्यक असल्याने त्यांना आनुदान मिळणे विचारधीन आहे. असे समजताच त्यांनी आत्महत्या करून निषेध करु असे अवाहन करीताच. त्या ठिकाणी उपस्थीत असलेले जि. प . सदस्य सुरेंद्र वाळवेकर, सरपंच विजय चोपडे, ग्रामसेवक आर. डी. पाटील, तलाठी गौसमहमंद लांडगे, दक्षिण भाग सोसायटीचे चेअरमन बाळासोकाका मोहीते, उपसरपंच चंद्रशेखर केंगार यांनी समजूत काढीत यावर तोडगा काढून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.