जिनीव्हा
जागतिक आरोग्य संघटनेने अन्नधान्याच्या किमतीतील वाढीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रशिया-युपेन यांच्यातील युद्धाचा परिणाम अन्नपदार्थांच्या किमती वाढीत दिसून आला आहे. याचा सर्वस्वी परिणाम गरीब देशांवरती अधिक प्रमाणात दिसून येणार असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष नोगोझी ओकोंजो-इवीला यांनी, जगामध्ये खाद्यपदार्थ व ऊर्जा या दोनच गोष्टी गरीब लोकांसाठी फार महत्त्वाच्या आहेत. अन्नपदार्थासह धान्याच्या किंमती वाढल्याने गरीब देशामध्ये उपासमारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. जागतिक गव्हाच्या पुरवठय़ामध्ये रशिया आणि युपेन यांचा वाटा हा 24 टक्के इतका आहे. युपेन हा देश 50 टक्के इतका गहू जागतिक अन्न कार्यक्रमासाठी देत असतो. युपेनवरील हल्ल्यामुळे यासंदर्भात अडचणी येण्याची शक्मयता असल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढून गरीब देशांना संकटाचा सामना करावा लागण्याची संघटनेने शक्यता वर्तवली आहे.









