वार्ताहर /पालये
ही घटना आहे देऊळवाडा-पालये येथील. या वाडय़ावरील एक ज्येष्ठ महिला कृष्णाबाई जयराम मणेरकर (वय 85) यांनी रविवार 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरातूनच मतदान केले. त्याचदिवशी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. हे मतदान त्यांचे अखेरचे ठरले. सोमवार 7 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुलगे अंकुश, रवींद्र, महादेव, दामोदर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कुठल्याही पक्षाला का असेना या ज्येष्ठ महिलेचे मत सार्थकी ठरले आहे. लोकशाही प्रणालीतील खऱया अर्थाने मतदानरूपी भूमिका आपल्या मातोश्रीने वठवली असून आपल्याला तिचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांचे पुत्र रवींद्र मणेरकर यांनी व्यक्त केली.









