आवळी बुद्रुक/प्रतिनिधी
अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गासाठी अनुदानित शासनमान्य वाचनालये सुरु करावीत अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे राधानगरी तालुका अध्यक्ष संभाजीराव कांबळे यांनी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना दिले.
शासनाच्या नियमानुसार एक गाव एक वाचनालय योजना कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आली. परंतु युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळण्याबाबत उणीवा भासत आहेत. तसेच गरीब, गरजू व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तळागाळातील ग्रामीण विद्यार्थ्यांना याचा पुरेपुर फायदा घेता येत नाही. याकरिता राज्य व केंद्र शासनाने अनुसूचित जाती जमाती प्रवर्गसाठी विशेष अनुदानीत वाचनालय सुरु करावित यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी संभाजीराव कांबळे यांनी केली.
वाचन संस्कृतीचा पुरेपूर फायदा घेता यावा व तसेच स्पर्धात्मक युगात सनदी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जडण-घडणीकरता अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील विशेष बाब म्हणून अनुदानित व शासन मान्य वाचनालयाची निर्मिती करणे व दीर्घकाळ चालण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असेही निवेदनात म्हटले आहे.