वृत्तसंस्था/ /पतियाळा
वृत्तसंस्था/ /पतियाळा
फेडरेशन चषक वरिष्ठांच्या राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात अनु रानीने यापूर्वीचा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत तामिळनाडूच्या 22 वर्षीय धनलक्ष्मीने ओडिशाच्या दुती चंदला मागे टाकत सुवर्णपदक मिळविले. पुरूषांच्या लांब उडीत मुरली श्रीशंकरने सुवर्णपदक मिळवित नव्या राष्ट्रीय विक्रमासह टोकियो ऑलिंपिकचे तिकीट आरक्षित केले. पुरूषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीमधील सुवर्णपदक पंजाबच्या गुरविंदर सिंगने पटकाविले.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या भालाफेकमध्ये 28 वर्षीय अनु रानीने तिसऱया प्रयत्नात 63.24 मी. भालाफेक करत सुवर्णपदक मिळविताना यापूर्वी म्हणजे 2019 साली डोहा येथे झालेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत नोंदविलेला स्वतःचाच 62.43 मी. चा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. मात्र ऑलिंपिक पात्रतेची मर्यादा तिची अर्ध्या मीटरने हुकली. 2014 च्या आशियाई स्पर्धेत कास्य तर 2019 च्या आशियाई स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळविले होते. महिलांच्या भालाफेक प्रकारात राजस्थानच्या संजना चौधरीने 54.55 मी. अंतर नोंदवित रौप्य तर हरियाणाच्या कुमारी शर्मिलाने 50.78 मी. अंतर नोंदवित कास्य पदक मिळविले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उत्तरप्रदेशने तीन सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या 10,000 मी. धावण्याच्या शर्यतीत उत्तरप्रदेशच्या 21 वर्षीय सविता पालने सुवर्णपदक पटकाविताना महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला मागे टाकले. गोळाफेक या प्रकारात उत्तरप्रदेशच्या किरण बलियानने 16.45 मी. अंतर नोंदवित सुवर्णपदक घेतले.
तामिळनाडूच्या रोझी पॉलराजने महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये 3.80 मी. अंतर नोंदवित सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत तामिळनाडूच्या 22 वर्षीय धनलक्ष्मीने 11.39 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण तर ओडिशाच्या दुती चंदने 11.58 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक आणि तामिळनाडूच्या अर्चना सुसेनद्रनने 11.76 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक पटकाविवले. या स्पर्धेतील धनलक्ष्मी ही सर्वात वेगवान महिला धावपटू ठरली आहे. या क्रीडाप्रकारात हिमा दासला पंचांनी लाल कार्ड दाखविल्याने ती अपात्र ठरली. पुरूषांच्या लांब उडीमध्ये 21 वर्षीय मुरली श्रीशंकरने नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळविताना 8.26 मी. अंतर नोंदविले. टोकियो ऑलिंपिकसाठी श्रीशंकरने आपले तिकीट या कामगिरीमुळे निश्चित केले आहे. मुरली श्रीशंकरने यापूर्वी या क्रीडाप्रकारात नोंदविलेला 8.20 मी.चा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. पंजाबच्या गुरविंदर सिंगने पुरूषांची 100 मी. धावण्याची शर्यत जिंकली. त्याने 10.32 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. तामिळनाडूच्या इ.कन्नडाने 10.43 सेकंदाचा अवधी घेत रौप्य आणि महाराष्ट्राच्या सतीश कृष्णकुमारने 10.56 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक मिळविले.
फेडरेशन चषक वरिष्ठांच्या राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात अनु रानीने यापूर्वीचा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत तामिळनाडूच्या 22 वर्षीय धनलक्ष्मीने ओडिशाच्या दुती चंदला मागे टाकत सुवर्णपदक मिळविले. पुरूषांच्या लांब उडीत मुरली श्रीशंकरने सुवर्णपदक मिळवित नव्या राष्ट्रीय विक्रमासह टोकियो ऑलिंपिकचे तिकीट आरक्षित केले. पुरूषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीमधील सुवर्णपदक पंजाबच्या गुरविंदर सिंगने पटकाविले.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या भालाफेकमध्ये 28 वर्षीय अनु रानीने तिसऱया प्रयत्नात 63.24 मी. भालाफेक करत सुवर्णपदक मिळविताना यापूर्वी म्हणजे 2019 साली डोहा येथे झालेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत नोंदविलेला स्वतःचाच 62.43 मी. चा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. मात्र ऑलिंपिक पात्रतेची मर्यादा तिची अर्ध्या मीटरने हुकली. 2014 च्या आशियाई स्पर्धेत कास्य तर 2019 च्या आशियाई स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळविले होते. महिलांच्या भालाफेक प्रकारात राजस्थानच्या संजना चौधरीने 54.55 मी. अंतर नोंदवित रौप्य तर हरियाणाच्या कुमारी शर्मिलाने 50.78 मी. अंतर नोंदवित कास्य पदक मिळविले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उत्तरप्रदेशने तीन सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या 10,000 मी. धावण्याच्या शर्यतीत उत्तरप्रदेशच्या 21 वर्षीय सविता पालने सुवर्णपदक पटकाविताना महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला मागे टाकले. गोळाफेक या प्रकारात उत्तरप्रदेशच्या किरण बलियानने 16.45 मी. अंतर नोंदवित सुवर्णपदक घेतले.
तामिळनाडूच्या रोझी पॉलराजने महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये 3.80 मी. अंतर नोंदवित सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत तामिळनाडूच्या 22 वर्षीय धनलक्ष्मीने 11.39 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण तर ओडिशाच्या दुती चंदने 11.58 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक आणि तामिळनाडूच्या अर्चना सुसेनद्रनने 11.76 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक पटकाविवले. या स्पर्धेतील धनलक्ष्मी ही सर्वात वेगवान महिला धावपटू ठरली आहे. या क्रीडाप्रकारात हिमा दासला पंचांनी लाल कार्ड दाखविल्याने ती अपात्र ठरली.
पुरूषांच्या लांब उडीमध्ये 21 वर्षीय मुरली श्रीशंकरने नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळविताना 8.26 मी. अंतर नोंदविले. टोकियो ऑलिंपिकसाठी श्रीशंकरने आपले तिकीट या कामगिरीमुळे निश्चित केले आहे. मुरली श्रीशंकरने यापूर्वी या क्रीडाप्रकारात नोंदविलेला 8.20 मी.चा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. पंजाबच्या गुरविंदर सिंगने पुरूषांची 100 मी. धावण्याची शर्यत जिंकली. त्याने 10.32 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. तामिळनाडूच्या इ.कन्नडाने 10.43 सेकंदाचा अवधी घेत रौप्य आणि महाराष्ट्राच्या सतीश कृष्णकुमारने 10.56 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक मिळविले.