मुंबई \ ऑनलाईन टीम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर रविवारी सकाळीच ईडीने छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने पुन्हा एकदा कारवाई सुरु केली आहे. अनिल देशमुख यांचे निवासस्थान काटोल आणि वडविहीराच्या घरी छापेमारी केली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल नटखट तालुक्यातील देशमुखांच्या मुळगावी ही छापेमारी करण्यात आली आहे.
ईडीने काही दिवसांपुर्वी अनिल देशमुख यांची एकूण ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्य मुंबई वरळीमधील सुखदा या इमारतीमधील पत्नीच्या नावे असलेला एक फ्लॅट सील केला असून या फ्लॅटची एकूण किंमत १ कोटी ५४ लाख रुपये आहे. तसेच उरण येथील २ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची जमीन जप्त केली आहे. तसेच नागपूर येथे असलेली मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.
Previous Articleकोरोना नियंत्रणासाठी `सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’
Next Article देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ








