मुंबई \ ऑनलाईन टीम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्या ईडी कोठडीत स्पेशल पीएमएलए कोर्टाने पाच दिवसांची वाढ केली आहे. या दोघांना ६ जुलैपर्यंत ईडी कोठडी असणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २५ जून रोजी दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि सहाय्यक संजीव पालांडे यांना आज पीएमएलए कोर्ट नंबर १६ येथे दुसऱ्या रिमांड करिता आणण्यात आलं होतं. यावेळी ईडीने आणखी सात दिवस कोठडी मिळावी असं कोर्टात सांगितलं. कोर्टाने ६ जुलैपर्यंत कोठडी वाढवून दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








