50 हुन अधिक बैलजोडींचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ येथील श्री कलमेश्वर बैलगाडी युवा शर्यत कमिटीच्या वतीने आयोजित एकदिवसीय शर्यतीत बसवेश्वर प्रसन्न बसरीकट्टी या बैलजोडीने प्रथम क्रमांक, श्री गणकाई देवी प्रसन्न बेटगेरी यांनी दुसरा तर ज्योतिर्लिंग प्रसन्न बेळगुंदीने तिसरा क्रमांक पटकाविला.
रविवारी सकाळी या शर्यतीचे उद्घाटन अण्णासाहेब गुंडप्पणावर यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजनाने करण्यात आले. अनगोळ शिवारातील रिंग रोड येथे एका बैलजोडीने चाके न बांधता बैलगाडी पळविण्याची ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम बक्षीस श्री बसवेश्वर प्रसन्न बसरीकट्टी (1984-10) 35,000, दुसरे श्री गणकाई देवी प्रसन्न बेटगेरी (1971-09) 30,000, तिसरे श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न बेळगुंदी (1946-10) 25,000, चौथे श्री मसणाई देवी प्रसन्न मोदेकोप (1936-08) 21,000, पाचवे श्री सिध्देश्वर प्रसन्न मोदगा (1924-05) 17000, सहावे श्री जय हनुमान प्रसन्न डुकरवाडी (1922-00) 16000, सातवे नारायण लक्ष्मण कारवेकर मोदेकोप (1918-03) 15000, आठवे ब्रम्हदेव प्रसन्न सांबरा (1904-00) 14000, नववे श्री सिध्दनाथ पवनाई प्रसन्न बैलूर (1899-06) 13000, दहावे श्री वसंत खोबाण्णा डुकरे किणये (1898-11) 12000, अकरावे श्री नागनाथ प्रसन्न बेक्कीनकेरी (1887-01) 11000, बारावे श्री कलमेश्वर प्रसन्न अनगोळ (1885-07) 10000, तेरावे श्री लक्ष्मी प्रसन्न मुतगा (1882-03) 9000, चौदावे श्री पद्मावती प्रसन्न अनगोळ (1875-11) 8000, पंधरावे श्री सोमेश्वर प्रसन्न चिक्कबागेवाडी (1875-10) 7000, सोळावे श्री परमार प्रसन्न एस धामणे (1875-05) 6000, सतरावे श्री ज्योतिर्लिंग मरवादेवी प्रसन्न कुप्पटगिरी (1869-05) 5000, अठरावे श्री जय मल्हार प्रसन्न कुदनुर (1868-00) 4000, अशी एकूण अठरा बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
एकवीसाव्या लक्की क्रमांकाचा मान श्री कलमेश्वर प्रसन्न सांबरा (1815-00) 5,555 या जोडीला मिळाला. प्रसिद्ध मूर्तीकार कै. जे. जे. पाटील यांच्या स्मरणार्थ विनायक पाटील यांनी प्रथम क्रमांकाच्या विजेत्या बैलजोडी मालकाला आकर्षक शोभेची बैलजोडी बक्षीस दिली. प्रमुख पाहुणे अण्णासाहेब गुंडप्पणावर, आफताब (अप्पा) जमादार, श्रीकांत कुऱयाळकर, संदीप लाटूकर, यल्लाप्पा कल्लप्पा पाटील, पुरुषोत्तम चौगुले, रवी धाकलुचे, आनंद यल्लमण्णावर, महावीर सातगौडा, मल्लाप्पा सांबरेकर, रतन यल्लमण्णावर तसेच कलमेश्वर बैलगाडी युवा शर्यत कमिटीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी अनगोळ शिवारात दिवसभर हजारो शर्यतप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाच्या व्यत्ययानंतर ही शर्यत उत्साहात पार पडली. बेळगाव जिल्हा तसेच महाराष्ट्रातून पन्नासहून अधिक बैलजोडय़ांनी या शर्यतीत भाग घेतला होता. मोहन खन्नूकर यांनी सूत्रसंचालन केले तर रवी पाटील यांनी आभार मानले. यावेळी मंडळाचे सदस्य, शेतकरी बांधव उपस्थित होते.









