बिम्स प्रशासनाची मनमानी सुरूच, कारभार पाहण्यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी बेळगावला येणार : परिचारिका आक्रमक
प्रतिनिधी / बेळगाव
संपूर्ण राज्यात सध्या मनमानी कारभारामुळे ठळक चर्चेत असलेल्या बिम्सचा कारभार पाहण्यासाठी शुक्रवार दि. 4 जून रोजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा बेळगावला येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर बिम्स प्रशासनाला जाग आली असून वरि÷ांच्या भानगडी झाकून ठेवण्यासाठी सोमवारी सायंकाळी सहा परिचारिकांवरच (नर्सेस) सेवामुक्तीची कुऱहाड चालविण्यात आली. यामुळे परिचारिका आक्रमक बनल्या असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहा परिचारिकांना त्यांच्या सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांची मुक्तता करण्यात आली असून आपण कारवाई करतो आहे हे दाखविण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा बजाविणाऱया परिचारिकांना बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्री बिम्सच्या कारभाराला कंटाळले आहेत. वाढत्या तक्रारींमुळे या कारभाराचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी ते बेळगावला येणार आहेत, अशी माहिती आहे. मात्र अद्याप त्यांचा अधिकृत दौरा जाहीर झाला नाही.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शनिवारी 29 मे रोजी पीपीई कीट परिधान करुन बिम्सच्या कोविड वॉर्डला भेट दिली होती. त्यावेळी वॉर्डबाहेर एक मृतदेह पडून होता. तो शवागारात हलविण्यात आला नव्हता. त्यामुळे उपमुख्यमंत्री बिम्सच्या अधिकाऱयांवर भडकले होते. एकीकडे कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असतानाच त्यांच्या शेजारीच मृतदेह का ठेवला? मृतदेह ठेवल्यामुळे बाधितांच्या मनावर परिणाम होणार नाही का? असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता.
याच मुद्दय़ावर सोमवारी प्रभारी मेट्रन कांचनमाला सूर्यवंशी, सुजाता बत्तुला, जयलक्ष्मी पत्तार, शैलजा कुलकर्णी, सुशिला शेट्टी, सविता तम्माण्णाचे या परिचारिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तीन दिवसात उत्तर देण्याची सूचना नोटिसांत करण्यात आली होती. मात्र नोटीस देवून तीन दिवस होण्याआधीच तुमचे उत्तर मिळाले नाही असे सांगत जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांना बिम्समधून मुक्त केले आहे.
या सर्व सहा परिचारिका आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या अखत्यारित काम करतात. त्यांना विजापूर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अप्पर संचालकांच्या कार्यालयात रुजू होण्याची सूचना करण्यात आली आहे. या प्रकारामुळे बिम्समधील परिचारिका संतप्त झाल्या आहेत. कुणाच्या तरी चुकांची शिक्षा आम्हाला का? असा जाब विचारत त्यांनी शल्यचिकित्सकांची भेट घेतली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेवून हा प्रकार त्यांचा निदर्शनास आणून देण्यात आला आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना परिचारिकांना सेवेतून मुक्त का केले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून बिम्सचा भोंगळ कारभार त्यांच्या निदर्शनास आणून देण्याची तयारी येथील काही कर्मचाऱयांनी केली असून मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत.
सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत पूर्णपणे कामावर बहिष्कार टाकला तर रुग्णांची गैरसोय होणार आहे म्हणून त्याचा सारासार विचार करुन मंगळवारी आंदोलन छेडण्याचा निर्णय परिचारिकांनी घेतला आहे. विभाग प्रमुख कोणीही वॉर्डला येत नाहीत. कनि÷ डॉक्टर व परिचारिकांवरच रुग्ण सेवेचा भार आहे. अशा परिस्थितीत जर परिचारिकांनी संपाचा निर्णय घेतला तर आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती आहे.चौकट करणे
आरोग्य विभाग बिम्सचे टार्गेट
सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी प्रशासनातील वरि÷ांची झाडाझडती घेतली आहे. त्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत. आता आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी व परिचारिकांना टार्गेट करण्यात आले आहे. बिम्स ही स्वायत्त संस्था आहे. कारवाई दाखविण्यासाठी सहा परिचारिका, एक डॉक्टर असे एकूण सात ते आठ जणांना टार्गेट करण्यात आले असून बिम्समधील अधिकारी व कर्मचाऱयांना सुरक्षित ठेवून केवळ आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या अखत्यारितील कर्मचाऱयांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे प्रकरण कोठपर्यंत जाऊन पोहोचणार? कोरोनाबाधितांना धीर देवून त्यांच्यावर उपचार करुन त्यांचा जीव वाचविण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची सोडून संकटाच्या काळातही बिम्समध्ये मनमानी कारभार सुरू झाला आहे. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे.