वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराला रंग चढला असून मतदारांना पैसे वाटून आपल्या अंकित करून घेण्याचे प्रकारही समोर येत आहेत. चेपॉक मतदारसंघात मतदारांना 500 रुपयांच्या नोटा वाटताना अद्रमुकच्या एका नेत्याला कॅमेऱयात पकडण्यात आले आहे. त्याच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. हा नेता मतदारांना त्यांची ओळखपत्रे पाहून पैसे वाटत असल्याचे व्हिडिओग्राफीमध्ये दिसत आहे. या मतदारसंघात द्रमुकचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयानिधी स्टॅलिन निवडणूक लढवित आहेत. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याची घोषणा केली आहे.









