ऑनलाईन टीम / कोलंबो :
श्रीलंकेतील ‘वेस्टर्न कंटेनर टर्मिनल’चे कंत्राट भारतातील अदानी समुहाला मिळाले आहे. नुकताच यासंदर्भात अदानी समुहाबरोबर 70 कोटी डॉलर्सचा करार झाला आहे. या करारामुळे भारताला श्रीलंकेसोबत समरिक संबंध राखण्यास मदत होणार आहे.
चीनचे श्रीलंकेसोबत हितसंबंध गुंतलेले असून, श्रीलंकेतील विविध प्रकल्पांना चीनकडून निधी मिळत आहे. त्यामुळे हे कंत्राट भारतीय कंपनीला देण्यास श्रीलंकेतील व्यापारी संघटनांनी विरोध केला होता. तरी देखील भारतीय कंपनीला श्रीलंकेतील ‘वेस्टर्न कंटेनर टर्मिनल’चे कंत्राट मिळाल्याने हा भारताने चीनला दिलेला शह मानला जात आहे. ‘वेस्टर्न कंटेनर टर्मिनल’साठी अदानी समूहाला 85 टक्के, तर ईस्ट कंटेनर टर्मिनलसाठी भारत आणि जपानला मिळून 49 टक्के गुंतवणूक करता येणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असणार आहे.