मुंबई
अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांचे पुन्हा एकदा श्रीमंताच्या यादीमधील स्थान घसरले आहे. जगातील धनाढय़ांच्या यादीमध्ये ते 15 व्या स्थानी पोहोचले आहेत. तर रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी यांनी 13 वे स्थान प्राप्त केले आहे. मंगळवार व बुधवारच्या सत्रामधील कामगिरीनंतर त्यांच्या कंपन्यांचे समभाग प्रभावीत झाल्याने हा परिणाम पहावयास मिळाला आहे.
ब्लूमबर्ग बिलिनेयर निर्देशांकाच्या अहवालानुसार चीनचे अब्जाधीश झेंग शैनशैन पुन्हा एकदा 14 व्या नंबरवर कायम राहिले आहेत. या अगोदर गौतम अदानी यांनी हे स्थान प्राप्त केले होते. अदानी ट्रान्समिशनचे समभाग हे 5 टक्क्यांनी घसरत 1378 रुपयावर राहिले आहेत. तसेच ग्रीन एनर्जी आणि अदानी पॉवरही घसरणीतच ट्रेडिंग करत आहे. मात्र अन्य तीन कंपन्या अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्राईजेस आणि अदानी पोर्टचे समभाग मात्र तेजीसह व्यवहारात राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.









