वेंगुर्ला/प्रतिनिधी:
लाँकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवेसाठी शासनाने ठरवून दिलेली सकाळची ०७ ते ११ ही वेळ गैरसोयीची असल्याने या वेळेत वाढ करण्यात यावी किंवा ही वेळ सकाळी ९ ते दुपारी १ अशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांनी केली आहे. वेंगुर्ले तहसीलदार व न. प. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लाँकडाऊन मध्ये दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी ७ ते ११ पर्यत दुकाने उघडी ठेवण्यास शासनाने मुभा दिली आहे. सर्व महाराष्ट्र भर तो नियम लागू आहे. मात्र प्राप्त परिस्थिती मध्ये त्यामध्ये शिथीलता किंवा बदल करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना व तालुका पातळीवर तहसीलदार यांना दिलेला आहे. मोठ्या शहरांमध्ये सकाळी ७ ते ११ ही वेळ ठिक आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही वेळ योग्य नाही. ग्रामीण भागातील ग्राहक सकाळी १०-११ वाजता शहरातील बाजारामध्ये पोहोचतात. अन या वेळेत दुकानदार दुकान बंद करण्याच्या तयारीत असतो. मात्र नेहमीचे ग्राहक आपल्या पासून तूटू नये म्हणून नाईलाजाने नियम त्याला मोडावा लागतो.