उचगाव / वार्ताहर
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रान्सपोर्ट वाहतूकदार, चालक-मालक यांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देवून लसीकरणास प्राधान्य देण्यात यावे अशी गांधीनगर गुड्स मोटर मालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे.
कोरोना काळात अत्यावश्यक सेवा पुरवणयासाठी देशामध्ये फिरत असतात राज्यातील वाहतूकदार ट्रान्सपोर्ट मालक व चालक ड्रायव्हर कोरोनाशी लढा देत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम करत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन जणांना कोरोना संसर्गाचा सामना करत जीव गमवावा लागला आहे .त्यामुळे अशा ट्रान्सपोर्ट चालक मालकांना ड्रायव्हर यांना तात्काळ लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.