आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे झाले नसतानाही लोकप्रतिनिधींना पंचनामे झाल्याचे सांगणाऱ्या तालूका कृषि विभागाचा युवा नेते अनिल पाटील यांनी पंचनामा केला. पंचनामे पूर्ण झाले नसतानाही चुकीची माहिती देणाऱ्या कृषि सहाय्यकांसह कषि अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरण्यात आले. कृषि विभागाच्या पंचनाम्यानुसार फक्त २६७ शेतकऱ्यांचे १०४ हेक्टर इतकेच नुकसान झाले आहे. मोठे नुकसान होवुन देखील शेतकऱ्यांचे पंचनामे होत नसल्याने कृषि विभागाचा कारभार चर्चेत आला.
आटपाडी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. १८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. तालुक्यात दिवसात ९४.६६ इतक्या पावसाची नोंद झाली. आटपाडी मंडलमध्ये १३८ तर दिघंची मंडलमध्ये ९० मिली मिटर इतका पाऊस झाला. पावसाने शेती आणि शेतकरी पूर्णत: उध्दवस्त झाला. अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर आटपाडीचे युवा नेते अनिल पाटील यांनी आमदार अनिलराव बाबर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. गुरुवारी तालुका कृषि अधिकारी पोपट पाटील यांची भेट घेत अनिल पाटील यांनी पंचनामेच झाले नसल्याचे सांगितले. तर कृषि अधिकाऱ्यांनी आम्ही पंचनामे केले आहेत, असे स्पष्ट केले.
कृषि विभागाच्या पंचनाम्यानुसार तालुक्यात फक्त १२७ शेतकऱ्यांचे ५४.४० हेक्टर क्षेत्रातील डाळिंबाचे नुकसान झाले आहे. बाजरी, मुग, उडीद आदि पिकांचे ४३ शेतकऱ्यांचे आणि ९४ शेतकऱ्यांचे ३०.६५ हेक्टर इतके नुकसान झाले असुन असे एकुण २६७ शेतकयांचे १०४ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. हे पंचनामे गतवषपिक्षा तब्बल ९९टक्के इतके कमी नुकसान असल्याचे दर्शवत असुन ही बाब गंभीर बनली आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आटपाडी तालुक्यातील १०हजार ४८९ हेक्टर क्षेत्राचे म्हणजे २६ हजार २२२ एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. चालू वर्षी दमदार आणि अतिवृष्टी असतानाही मोठे नुकसान होऊनही कृषि विभागाने १०४ हेक्टरचे म्हणजे फक्त २६० एकर आणि २६७ शेतकऱ्यांचेच नुकसान असल्याचा पंचनामा केला आहे. ही सरळ धळफेक असल्याचा आरोप करत अनिल पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडे हा प्रश्न मांडला. आमदार आणि खासदार यांनी तालुका कृषी अधिकारी पोपट पाटील यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








