बेंगळूर : प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी सांगितले की त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी एक टीम पाठवण्याची विनंती केंद्राला केली आहे. “वित्त विभागाने आपत्ती व्यवस्थापन सचिवांना पत्र लिहिले आहे. निधी आल्यानंतर मदतीची रक्कम जारी केली जाईल. नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी एक टीम पाठवण्यासाठी केंद्रालाही पत्र लिहिले आहे” असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले.
महिनाभराच्या पावसाने राज्याच्या काही भागांत हाहाकार माजवला, जिथे अनेकांना जीव गमवावा लागला, तर मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आणि विस्तीर्ण भागातील उभी पिके नष्ट झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले आहे. मात्र, केंद्रीय पथकाने मूल्यांकन पूर्ण केल्यानंतर केंद्राला सविस्तर निवेदन देऊ, असे त्यांनी सांगितले. बोम्माई म्हणाले की, जिल्ह्यांकडे मदत कार्यासाठी 685 कोटी रुपये आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये मदत रकमेचे वितरण सुरू आहे. अशीही माहीती मुख्यमंत्र्यांनी दिली.