बेळगाव : अतिवाड गावच्या धरणाशेजारी नूतन ग्रा. पं. सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. धरणाशेजारी असलेल्या जॅकवेलला झाडाझुडपांनी वेढले होते. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱया कर्मचाऱयांना अडचणी निर्माण होत होत्या. याची दखल घेत बेकिनकेरे ग्रा. पं. वर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
धरणाशेजारी शेतीचे क्षेत्र आहे. त्यामुळे शेतकऱयांची नेहमी ये-जा असते. शिवाय धरणातील पाण्याचा उपसा करण्यासाठी धरणाकडे जावे लागते. मात्र, जॅकवेलच्या सभोवती झाडेझुडपे वाढल्याने परिसरात फिरणे धोकादायक बनले होते. याची दखल घेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नूतन ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील, भरमा व्हरकेरी, विद्या पाटील, अनिता मण्णूरकरसह अनंत पाटील, अनंत जे. पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.









